Share

‘इंग्लंडकडे अजुनही डावाने सामना जिंकण्याची संधी’, डॉमीनिक कॉर्कने व्यक्त केला विश्वास

Published On: 

मुंबई : लीड्स कसोटीत टीम इंडियाने दुसऱ्या डावात जोरदार पुनरागमन केले आहे. पहिला डाव ७८ धावांवर अटोपल्यानंतर दुसऱ्या डावात भारताने २ गडी गमावून २१५ धावांची मजल मारली आहे. मात्र अद्यापही टीम इंडिया १३९ धावांनी पिछाडीवर आहे.

पहिल्याच दिवशी सामन्यावर पकड मिळवल्यानंतर तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियाने जोरदार पुनरागमन केले आहे. भारतीय संघ दुसऱ्या डावात अद्यापही १३९ धावांनी पिछाडीवर आहे. तरीही इंग्लंडचा संघ या सामन्यात डावाने विजय मिळवु शकतो असा विश्वास इंग्लंडचे माजी खेळाडू डॉमीनीक कॉर्क यांनी व्यक्त केला आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. लीड्स कसोटीत जर इंग्लंडला अद्यापही डावाने विजय मिळवायचा असेल तर चौथ्या दिवशी त्यांनी प्रतिस्पर्धी संघाचे किमान तीन गडी बाद करणे गरजेचे आहे.

जर इंग्लंडचा संघाने सुरुवातीच्या सत्रात जर भारताचे ४ गडी बाद केले तर इंग्लंड अजुनही सामना डावाने जिंकु शकतो. लीड्स कसोटीच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव ७८ धावांवर अटोपला. यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात ४३२ धावांची मजल मारत भारताविरुद्ध ३५४ धावांची भक्कम आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात २ गडी गमावुन २१५ धावांची मजल मारली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!