औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्याविरूध्द विद्यार्थीनीने विशाखा समितीकडे तक्रार केली आहे. व्हॉटसअॅपच्या माध्यमातून लगट करण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला असून प्रकरणात संजय शिंदे यांच्यावर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आरोपीला बडतर्फ करा अशी मागणी युवा सेनेचे उपसचिव माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेऊन केली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
कामाच्या ठिकाणी महिला व विद्यार्थी यांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा २०१३ व विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम २ मे २०१६ नुसार अंतर्गत तक्रार समितीच्या पिठासीन अधिकाऱ्यांकडे विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागातील विद्यार्थीनीने तक्रार दिली आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट बनविण्यासाठी लागणारी माहिती घेण्यासाठी २७ ऑगस्टला विद्यार्थीनी जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या दालनात गेली होती. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तिने चेहऱ्यावर मास्क लावला होता. परंतु, शिंदे यांनी चेहरा पाहण्यासाठी तिला मास्क काढण्यास सांगितले.
त्यानंतर ३ सप्टेंबरला रात्री १० वाजून ३८ मिनिटांस व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून मॅसेज पाठविले. ‘डियर तु खुप सुंदर आहेस. तु पहिल्या नजरेत आवडलीस. मला तुझ्याशी मैत्री करायची आहे. असे संवाद साधले. त्यांना मैत्री करण्यास नकार दिल्यानंतर बोल ना, तुला राग आला का? असे प्रतिप्रश्न करून नंतर मॅसेज डिलीट केले. यावेळी युवा सेना जिल्हा अधिकारी हनुमान शिंदे, भारतीय विद्यार्थी सेना विद्यापीठ प्रमुख डॉ. तुकाराम सराफ, शहर अधिकारी ज्योतीराम पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जींच्या विरोधात भाजपचा उमेदवार ठरला
- शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अर्ज ऑफलाईन गावातच स्विकारा, पालकमंत्र्यांच्या सूचना
- लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम या सरकारकडून होतंय; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
- ‘कोथरूडकरांच्या ॲमेनिटी स्पेसची विक्री करण्याचा गोरखधंदा सत्ताधारी भाजपने सुरू केला आहे’
- यशोमती ठाकूर यांनी केली भिक्षेकरी गृहातील वृद्धांची आस्थेनं चौकशी; समस्या सोडवण्याचे दिले आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

