Share

‘या’ स्वस्त इलेक्ट्रिक बाईक खरेदी नंतर इंधन दरवाढीवर पासून सुटका मिळावा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: आता प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. सुरुवातीला इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे या कार खरेदि केल्या जात नव्हत्या मात्र आता , कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत.

यामध्ये आता हैदराबादमधील इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्टअप कंपनीने गेल्या वर्षी पहिली इलेक्ट्रिक बाईक बाजारात लॉन्च केली आहे. भारतात गाडी लॉन्च झाल्यावर सुरुवातीची किंमत 50 हजार रुपये होती. इलेक्ट्रिक गाड्यांना ग्राहकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. एटम 1.0 गाडीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. आता पर्यंत 400 गाड्या बुक झाल्या आहेत.

या इलेक्ट्रिक बाईकचं नाव एटम 1.0 अस या बाईकच नाव आहे. एटम ही कॅफे-रेसर शैलीची इलेक्ट्रिक बाईक आहे. गाडीचे पहिले १० युनिट ग्राहकांना देण्यात आले आहेत. इंटरनेशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव टेक्नोलॉजी (आयसीएटी) व्यावसायिक वाहन म्हणून पूर्णपणे सुसज्ज, कमी वेगवान इलेक्ट्रिक दुचाकी वाहन म्हणून या मोटार सायकलला प्रमाणपत्र दिले आहे. यामध्ये एलईडी हेडलॅम्प्स, एलईडी टेललाइट्स, एलईडी टर्न इंडिकेटर, स्टाइलिश कॅफे-रेसर डिझाईन, आरामदायक सीट, गो-फॅट फॅट टायर्स, 200 मीमी ग्राऊंड क्लीयरन्स आणि इन्स्ट्रुमेंट कन्सोलसाठी ए डिजिटल डिस्प्लेचा समावेश आहे. सर्वसाधारण थ्री-पिन सॉकेट वापरुन ग्राहक कुठेही ही बाइक चार्ज करू शकतात. गाडी पुर्ण चार्ज होण्यासाठी 3 ते 4 तास लागतात.

एटम 1.0 इलेक्ट्रिक मोटरसायकल मध्ये 48v, 250w इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला आहे. जे पोर्टेबल लिथियम-आयन बॅटरी पॅकसह जोडलेले आहे. एटम 1.0 इलेक्ट्रिक पॉवरट्रेन एकाच चार्जवर जास्तीत जास्त १०० किमीची ड्राईव्हिंग करण्याचा दावा करते. त्याच वेळी, ही इलेक्ट्रिक मोटरसायकल 25 किमी प्रति तास गतीपर्यंत धावण्याची मर्यादा आहे.या इलेक्ट्रिक बाईकचे खास वैशिष्ट्य म्हणजे खरेदी केल्यावर याची नोंदणी करण्याची गरज नाही, तसेच त्या चालकासाठी त्याला ड्रायव्हिंग लायसन्सचीही आवश्यकता नाही. या बाईकचे एकूण वजन फक्त 108 किलो आहे. जी कोणत्याही वयोगटातील लोकं सहज वापरु शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!