पुणे : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने उपाययोजना प्रभावीपणे राबवत संभाव्य लाट थोपविण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या. कोरोनाशी एकजुटीने सामना करू असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसीसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण आदी विषयांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
गृहमंत्री वळसे पाटील पुढे म्हणाले, पहिल्या लाटेच्या तुलनेत आरोग्य विषयक सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे निश्चितच फायदा होतो आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे सुविधा निर्माण झाल्या आहेत. म्युकरमायकोसीस या नवीन आजाराची भर पडली आहे. हा आजार अचानक उद्भवतो. त्याचे उपचार महागडे आहेत त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, पुणे जिल्ह्याने लसीकरणामध्ये आघाडी घेतली आहे. लसीकरणासोबतच कोरोना चाचण्या वाढविण्याची गरज आहे. कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांकडून जादा बिलाची आकारणी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे बिल आकारणी होते की नाही याबाबत दररोज तपासणी करावी. जादा बिल आकारणी करणा-या रुग्णालयांवर कारवाई करा. ज्या रुग्णांलयाबाबत जादा बिल आकारणीच्या जास्त तक्रारी आहेत त्या रुग्णालयांची प्रत्येक बिलाची तपासणी करावी. असे निर्देश त्यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
- ओबीसींमध्ये नवा प्रवर्ग निर्माण करणे शक्य आहे का? ठाकरे, पवार, फडणवीस, चव्हाणांनी सांगावं
- आम्हाला भांडण करण्यात घेणंदेणं नाही, आम्हाला न्याय पाहिजे ; संभाजीराजे आक्रमक
- संभाजीराजे नवीन पक्षाबद्दल बोलले अन् सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडात झाला !
- ‘छत्रपती घराण्याचा वंशज हात जोडून विनंती करतोय, या समाजाला बाहेर फेकू नका’
- पुन्हा उसळणार : शरद पवार ६ जूनच्या आंदोलनाला येणार ? संभाजीराजे म्हणाले…


