🕒 1 min read
नागपूर : शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर ७२ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. त्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या हिट लिस्टवर आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भावना गवळींना ईडीकडून विनाकारण त्रास देण्यात येत आहे, असा आरोप करत त्यांचे समर्थन केले होते. आता शिवसेना नेत्यानेच भावना गवळी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यासोबतच, त्यांनी पवारांची फासांवूक केल्याचं देखील म्हटलं आहे.
शरद पवार यांची खासदार भावना गवळी यांनी दिशाभूल केली. खासदारांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख हरीश सारडा यांनी केला आहे. शरद पवार यांची भावना गवळी यांनी भेट घेतल्यानंतर सारडा यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली.
यावेळी ते म्हणाले, ‘पवार यांनी गवळी यांची बाजू घेतली नाही. ईडीच्या कारवाईबाबत गवळींनी खोटी माहिती देऊन पवारांची दिशाभूल केली. गवळी यांच्या १२ संस्था व ७ कंपन्या आहेत. ३ कंपन्यांच्या संचालक आहेत. ही माहिती त्यांनी दडवली. सरकार वा पक्षाचे त्यांना कोणतेही समर्थन लाभलेले नाही. मोठ्या नेत्यांचा आधार मिळावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राज्याच्या एका ज्येष्ठ नेत्याची दिशाभूल केल्याबद्दल गवळी यांनी शिवसैनिक तसेच, मतदारसंघ व राज्यातील जनतेची माफी मागावी,’ अशी मागणी देखील त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता
- शिवसेनेत गृहकलह ? भावना गवळींकडून जीवाला धोका; शिवसेना नेत्यानेच केला गंभीर आरोप
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- समाजातील वंचित घटकाला न्याय देण्याचा काँग्रेस पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे – पटोले
- तालिबान सरकारसाठी चीनने केली ३१० लाख डॉलरच्या मदतीची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
