🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली मतदारसंघाचा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गौतम गंभीरने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.
गौतम गंभीरने तक्रार केल्याचा खुलासा पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे. गौतम गंभीरने जीवे मारण्याची धमकी आल्यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे, अशी माहिती दिल्ली मध्यच्या पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांनी दिली आहे. गंभीरच्या कार्यालयामधून यासंदर्भातील एक पत्र पोलिसांना पाठवण्यात आलं आहे. या पत्रामधील मजकुरानुसार गंभीरला त्याच्या ई-मेलवरुन ही धमकी देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
23 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 9 वाजून 32 मिनिटांनी आलेल्या एका ई-मेलमध्ये खसदार गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घालून तपास करावा, असं पत्रात म्हटलं आहे. ‘भाजपचे पूर्व दिल्लीचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी दिल्ली पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना आयएसआयएस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये आम्ही तपास करत आहोत. तसेच गौतम गंभीर यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा आम्ही वाढवली आहे’, असं श्वेता चौहान यांनी सांगितलं आहे.
BJP MP from East Delhi Constituency &former Cricketer Gautam Gambhir has approached the Delhi Police, alleging he has received death threats from 'ISIS Kashmir'. The investigation is underway. Security has been beefed up outside Gambhir's residence: DCP central Shweta Chauhan
— ANI (@ANI) November 24, 2021
महत्वाच्या बातम्या
- परमबीर सिंग यांच्या वकिलांचा चौकशी आयोगासमोर मोठा खुलासा; म्हणाले…
- आम्ही शेवटपर्यंत एसटी कामगारांसोबत-सदाभाऊ खोत
- आंदोलन रबरासारखं, जास्त ताणल्यास तुटतं; सदाभाऊ खोत यांचं सूचक वक्तव्य
- शरद पवारांनी घेतली शशिकांत शिंदेंची भेट; बंद दाराआड चर्चा
- ओबीसींनी राजकीय आरक्षण ठाकरे सरकारमुळेच गमावले; भाजपचा आरोप!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
