Share

पिंपरी-चिंचवडमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढला; वायसीएममध्ये १२ रुग्णांचा मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

पिंपरी : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात अशी भीषण परिस्थिती असतानाच आता राज्यावर म्युकरमायकोसीस या नव्या आजाराचा मोठ्या प्रमाणात पसार होण्यास सुरुवात झाली आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. या आजाराची गंभीरता ही अधिक व उपचार हे अवघड असल्याने योग्य काळजी घेणे गरजेचे असून उपचाराचा खर्च लक्षात घेता म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये आता म्युकरमायकोसिस या रोगाचा धोका अधिक वाढत आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात या आजारामुळे १२ रुग्ण दगावले आहेत. तर दोन दिवसात ७० रुग्ण दाखल झाले आहेत. या रुग्णालयात दररोज ३ शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. यासोबतच, शहरातील इतर खासगी रुग्णालयांमध्येही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

काय आहे म्युकरमायकोसिस ?

कोरोना सोबतच आता म्युकरमायकोसीस हा बुरशीजन्य आजार देखील मोठ्या प्रमाणात पसरत आहे. नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येतो. या आजारावर लवकर उपचार नाही केले तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरीत परिणाम होतात व या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचे आहे. राज्यात अनेक ठिकाणी या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. तसेच अनेकांचा जीव देखील या आजाराने गेला आहे.

म्यूकरमायकोसिस हा बुरशीमुळे होणारा आजार असून, बुरशी हवेतून पसरते. त्याचा संसर्ग झाल्यास नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत बुरशी साठून राहते. कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन दिला जातो. तेव्हा त्या ऑक्सिजनमधील पाणी शुध्द असले पाहिजे. पाणी शुद्ध नसल्यास हा बुरशीजन्य आजार म्हणजेच म्युकरमायकोसिसची लागण होते. अशा व्यक्तींत नाकातून रक्त येणे, चेहरा एका बाजूने दुखणे, मेंदूत संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी, छातीत दुखणे, डोळ्यांना त्रास होणे, एकच दृश्य दोनदा दिसणे आदी प्रकारची लक्षणे आढळून येतात. कोव्हिडच्या आजारातून बरे झालेल्यांपैकी काही रुग्णांमध्ये हा आजार आढळून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!