Share

‘म्युकरमायकोसीस साठी स्वतंत्र उपचार केंद्र करा’, आ. अभिमन्यू पवार यांची मागणी

Published On: 

लातूर: कोरोना सोबतच आता म्युकरमायकोसीस हा रोग वेगाने पसरत आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना आजारातून बाहेर आलेल्या काही रुग्णांना म्युकर मायकोसिस हा बुरशीजन्य आजार होत असल्याचे समोर आले असून जिल्ह्यात या आजाराचे ३० पेक्षा अधिक नागरिकांना लक्षणे आढळून आली आहेत. हि बाब निश्चित गंभीर असून याबाबत लातूर येथे या आजाराचे निदान व उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी आ. अभिमन्यू पवार यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे केली आहे.

म्युकरमायकोसीस या आजाराची लक्षणे जाणवल्यास त्यांची तातडीने तपासणी व निदान होवून आशा आजारी रुग्णावर त्वरीत योग्य उपचार व्हावे तसेच या रोगाचा पसार होऊ नये यासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या रुग्णांसाठी स्वतंत्र वार्ड कार्यान्वित करण्यात यावे, या उपचारासाठी तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या समुहासह सर्व आवश्यक वैद्यकीय यंत्रसामुग्री व औषध साठा उपलब्ध करून घेण्यात यावा. यामुळे औषध उपचारासह वैद्यकीय सेवा अपुरी पडणार नाही.

याचबरोबर कोरोना मुक्त झालेल्या नागरिकांना म्युकर मायकोसिस आजाराच्या तपासणी अनुषंगाने गावपातळीवर आरोग्य विभागाच्या वतीने मोहीम राबविणे आवश्यक असून याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती आ. अभिमन्यू पवार यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना नाक दुखणे, नाकातून रक्तस्त्राव, तीव्र डोकेदुखी, दृष्टी व डोळ्यांवर सुज येणे, घाण वास येणे, ताप येणे, गिळण्यास त्रास होणे, आदी म्युकर मायकोसिस आजाराचे लक्षणे असून डोळे व नाकात होणाऱ्या संसर्गाची लक्षणे जाणवल्यास त्यानी तातडीने तज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन आ. अभिमन्यू पवार यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!