Share

‘गणपती विसर्जन’, औरंगाबादेत ९ झोनमध्ये ४० ठिकाणी मनपा प्रशासनाद्वारे गणपती संकलन!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या मर्यादित असली तरी घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी (दि. १९) विसर्जन विहिरींवर गर्दी होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने विसर्जनाची जबाबदारी स्वीकारली आहे. शहरातील ९ झोनमध्ये ४० ठिकाणी गणेश मुर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

महापालिकेतर्फे दरवर्षी शहराच्या विविध भागात गणेश विसर्जनासाठी ११ ठिकाणी व्यवस्था केली जाते. विसर्जन विहिरींची साफ-सफाई करून ज्या विहिरीत पाणी नसेल तिथे पाणी टाकले जाते. यंदा देखील विहिरींची सफाई करण्यात आली आहे. त्यासोबतच महापालिकेने ४० ठिकाणी गणेश मुर्ती स्वीकरण्याची व्यवस्था केली आहे. कोरोना संसर्गामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे रविवारी गणेश विसर्जनासाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विसर्जन विहिरीवर न जाता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे द्याव्यात, महापालिका एकत्रितपणे गणेशमूर्तीचे विसर्जन करेल, असे मनपाद्वारे सांगण्यात आले आहे.

निर्माल्य विहीरीत टाकू नका
निर्माल्य स्वीकारण्याची व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी निर्माल्य विहिरींमध्ये टाकू नये, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. जमा झालेल्या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत तयार केले जाणार आहे.

याठिकाणी व्यवस्था

खडकेश्वर महादेव मंदिर, वाणी कॉम्प्लेक्स पडेगाव, शहागंज चमन, गुलमंडी पार्किंग, सावरकर चौक, साखरे मंगल कार्यालय, पोलीस कॉलनी, टीव्ही सेंटर चौक, जटवाडा रोड, रामलीला मैदान एन-७, राजीव गांधी मैदान एन-५, चिकलठाणा बाजार, गरवारे स्टेडियम, मुकुंदवाडी बस स्टॉप, कामगार चौक, डॉ. आंबेडकर चौक चिकलठाणा, रामनगर चौक, कॅनॉट गार्डन, गजानन महाराज मंदिर, विजयनगर चौक, सूतगिरणी चौक, हनुमान नगर, उल्का नगरी, कांचनवाडी, मयूरबन कॉलनी, जाबिंदा लॉन्स, देवळाई चौक, रेणुकामाता मंदिर कमान, संत एकनाथ रंग मंदिर, उस्मानपुरा, कर्णपुरा.

गणेश विसर्जन विहिरी

भावसिंगपुरा, औरंगपुरा, हडको एन- १२, हर्सूल तलाव स्मृतिवन (कृत्रिम तलाव), संघर्षनगर, संतोषीमातानगर, मुकुंदवाडी गाव, शिवाजीनगर, सातारा गाव, जालाननगर, ज्योतीनगर (कृत्रिम तलाव).

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!