पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. समाजप्रबोधनाचा वारसा लाभलेला गणेशोत्सव या वर्षी समाजभान राखत प्रशासनाला सहकार्य करून साधेपणाने करण्याचा निर्णय देखील गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. पोलिसांनी बाप्पा मंडपात विराजमान न करता मंदिर असल्यास त्याच जागी प्रतिष्ठापना करावी, असे देखील सांगितले होते.
दरम्यान, सर्व मंडळांचे मंदिर नसते त्यामुळे त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता, नियम व अटी पाळून मंडळांना छोट्या मंडपाची परवानगी देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे अनेक मंडळांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी, योग्य ती काळजी व खबरदारी घेण्यासाठी पोलिसांनी नियमावली देखील जाहीर केली आहे. पुण्यातील मानाच्या पाच गणपती मंडळांनी गणपती हे मंडपातच विराजमान करण्याची भूमिका घेतली असून मंडपाच्या उभारणीचे काम सुरु झाले आहे. हा मंडप १० बाय १५ फुटांचा असणार आहे. तर, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल असे देखील या मंडळांनी सांगितले आहे.
मानाचा पहिला कसबा गणपती मंडळ, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी मंडळ, मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळ, मानाचा चौथा तुळशीबाग महागणपती मंडळ, मानाचा पाचवा केसरीवाडा मंडळ या मंडळांच्या मंडप उभारणीचे काम सुरु आहे.काल, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते वासापूजन करण्यात आले असून त्यांनी देखील शक्य असेल त्या मंडळांनी मंदिरातच गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केले आहे.
ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांचे निधन, पंढरपूरासह सहकार क्षेत्र शोकसागरात
दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मात्र मंदिरातच श्रींची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक वर्षी लाखो भाविकभक्त हे पुण्यातील आकर्षक देखावे व दिमाखदार गणेशोत्सव आगमन व विसर्जन सोहळा पाहण्यास येत असतात, यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवावर निर्बंध आले आहेत.
संजय राऊत यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न: मंत्री उदय सामंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

