Share

ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांचे निधन, पंढरपूरासह सहकार क्षेत्र शोकसागरात

Published On: 

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.सामान्य नागरिक ते अनेक नेते, खेळाडू तसेच सेलेब्रेटी देखील या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत.यातच सोलापूरातील ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं होत.

काल, त्यांच्या नातवाने फेसबुकद्वारे एक भावुक पोस्ट केली होती. त्यांच्या प्रकृतीसाठी आपण सर्वांनी प्रार्थना करावी अशी विनंती प्रितिश परिचारक यांनी केली. मात्र, सुधाकर परिचारक यांचे काल रात्री ११.३५ च्या सुमारास निधन झाल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. सुधाकर परिचारक यांच्या निधनामुळे पंढरपूरासह सहकार क्षेत्रात शोक पसरला आहे.

संजय राऊत यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न: मंत्री उदय सामंत

कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक हे एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार देखील होते. त्यांनी पाच वेळा आमदार म्हणून पंढरपूरचे नेतृत्व केले होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या परिचारक यांना सहकाराचे डॉक्टर म्हणून ओळखले जात असे. परिचारक यांचे अंत्यसंस्कार पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी फडणवीसांनी केल्या ‘या’ सुचना

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!