🕒 1 min read
सिंधुदुर्ग : खासदार संजय राऊत यांनी एका चॅनेलवरील मुलाखतीत उद्धव ठाकरेंच्या मेडिकल क्षेत्रातील ज्ञानावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंचे मेडिकल क्षेत्रातील ज्ञान अफाट असल्याचं सांगत जागतिक आरोग्य संघटनेतील डॉक्टरांना काय कळत, अस विधान केलं आहे. त्यांच्या या वक्त्यावावरून त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.
आता, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राजकारण करण्यासाठी विपर्यास केला जात असल्याचा आरोप त्यांनी विरोधकांवर लावत राऊतांचे समर्थन केले आहे. सिंधुदुर्गमध्ये स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून खासदार विनायक राऊत व मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काही डॉक्टर्स आणि नर्सेस यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी फडणवीसांनी केल्या ‘या’ सुचना
याबद्दल काल त्यांनी ट्विट करून माहिती दिली असता, संजय राऊत यांच्या विधानावर होणाऱ्या टीकेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, “शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून काही लोक राजकारण करण्याचा हीन प्रकार करत आहेत … कोरोना महामारी रोखण्यासाठी लढणारे सर्व डॉक्टर्स आमच्यासाठी देव-देवता प्रमाणे आहेत.”, असे ट्विट करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
मनसे व काँग्रेसमार्गे राष्ट्रवादीत घरवापसी करणारे पवार आहेत तरी कोण ?
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून काही लोक राजकारण करण्याचा हीन प्रकार करत आहेत … कोरोना महामारी रोखण्यासाठी लढणारे सर्व डॉक्टर्स आमच्यासाठी देव-देवता प्रमाणे आहेत. pic.twitter.com/Eah0oYaaK8
— Uday Samant (@samant_uday) August 17, 2020
संजय राऊत यांनी कोणतं विधान केलं होतं?
‘WHO ला काय कळतं? ती सीबीआयसारखीच आहे. WHO म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नही. कंपाऊंडरकडून घेतो. कारण त्यांना जास्त कळतं.’ असे विधान केलं होतं.
पुणे महापालिकेचा अजब कारभार तब्बल सव्वा पाच लाख रुपयांना खरेदी करणार एक झाड ?
या प्रकरणी संजय राऊत यांनी काल स्पष्टीकरण दिले आहे.
राऊत यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, डॉक्टरांवर संकट आली आहेत तेव्हा व्यक्तीश: मी मदतीला गेलोय. एका विशिष्ट राजकीय विचाराची लोक मोहिम चालवत असतील तर योग्य नाही. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून कोटी झालीय. डॉक्टरांचा बहुमान आहे की, कंपाऊंडरला त्यांनी इतकं निष्णात केले आहे. कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून काही डॉक्टरांनी टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.या प्रकरणात मी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही माझ्या विधानाचा अर्थच समजवून घेत नाही. बोलण्याच्या ओघात डॉक्टरांविषयी शाब्दिक कोटी झाली. यामुळे कोणाचा गैरसमज झाला असेल तर दूर करावा, मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, असेही राऊत यांनी म्हटले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

