🕒 1 min read
कोल्हापूर : सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर जरी कमी असला तरी सर्व धरणं, तलाव, ओढे ओसंडून वाहत असल्याने नद्यांच्या पाणीपातळीमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यातच पंचगंगेने धोका पातळी ओलांडल्यानंतर जिल्यातील पूरपरिस्थिती हि पुन्हा महापुरासारखी होताना दिसत होती, मात्र त्यानंतर पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता.
दरम्यान, गेल्या ४ ते ५ दिवसात पुन्हा पावसाने जोर धरल्यामुळे राधानगरी व कोयना धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे, त्यामुळे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली असून पावसाने विश्रांती घेतली नाही तर परिस्थिती अधिक बिघडू शकते. सद्या, राधानगरी धरणाच्या दोन दरवाज्यांमधून ४ हजार क्युसेक वेगाने भोगावती नदी मध्ये विसर्ग सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ९५ बंधारे पाण्याखाली गेले असून सतर्कता म्हणून नागरिकांचे स्थलांतर देखील करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांचे निधन, पंढरपूरासह सहकार क्षेत्र शोकसागरात
पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट एवढी असून धोक्याची पातळी ४३ फूट आहे. नदीने इशारा पातळी ओलांडली असून ३९ फूट आठ इंचावर पाणीपातळी पोहोचली आहे. तर, कोयना धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे कृष्णा नदीचा पाणीपातळीमध्ये देखील झपाट्याने वाढ होत आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणीपातळी हि ३८ फुटांवर गेली असून जिल्ह्यातील अनेक भागात पाणी शिरले आहे.
संजय राऊत यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न: मंत्री उदय सामंत
कोल्हापूर जिल्ह्यात देखील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी आले असून नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या स्थलांतरीतांची माहिती कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने दिलेली माहिती खालीलप्रमाणे-
अतिवृष्टीमुळे 4 गावांमधील 1709 व्यक्तींचे व 365 जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतरीत कुटुंबांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे करवीर तालुक्यातील चिखली गावातील 895 व्यक्ती 237 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आंबेवाडी गावातील 615 व्यक्ती 112 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी फडणवीसांनी केल्या ‘या’ सुचना
चंदगड- बाधित 1 गावातील 45 कुटुंबातील 184 व्यक्ती 16 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 8 कुटूंबातील 15 नागरिकांचे स्थलांतरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण 4 गावांमधील 1709 व्यक्तींना आणि 365 जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 1 संक्रमण शिबीरात 15 जण कोल्हापूर शहरात 1 ठिकाणी उघडण्यात आलेल्या संक्रमण शिबीरात 5 पुरुष 9 महिला तर 1 लहान मुल अशा 15 जणांचा समावेश आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

