🕒 1 min read
पुणे : गणेशाची प्राणप्रतिष्ठा सकाळी ११.१० मिनिटांनी होणार आहे. प्राणप्रतिष्ठेपूर्वी श्रीं ची मूर्ती मुख्य मंदिरातून वाजतगाजत मिरवणुकीने प्रतिवर्षी उत्सव मंडपात नेण्यात येते. प्रथेप्रमाणे आज सकाळी साडेआठ वाजता मंदिरामध्ये गणपतीची आरती करण्यात आली आणि मिरवणुकीला प्रारंभ झाला. फुलांनी सजवलेल्या शेषात्मज गणेश रथावर श्रींना विराजमान करण्यात आले.
मिरवणुकीच्या अग्रभागी गायकवाड आणि देवळणकर बंधू यांचे सनई-नगारा पथक, पुण्यातील सुप्रसिद्ध प्रभात, दरबार आणि मयूर बँड यांची पथके आणि गंधाक्ष ढोल- लेझीम पथक असा लवाजमा आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, तसेच माणिकदादा चव्हाण, हेमंत रासने, सुनिल रासने, महेश सूर्यवंशी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी भाविक, मंडळे यांच्याकडून फुले वाहून, पुष्पहार अर्पण करून उत्साहाने श्रीं चे स्वागत करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
राणेंच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटलांनी घेतली ‘ही’ भूमिका, म्हणाले…
१३ तारखेला लागणार विधानसभेची आचारसंहिता, रावसाहेब दानवेंच भाकीत


