Share

दुसऱ्या कसोटी सामन्यातील चार बदलांवर गंभीर म्हणाला…

Published On: 

ऑस्ट्रेलिया : पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी निराशाजनक कामिगिरी केली. यामुळे टीम इंडियात मोठे बदल करण्यात आले आहेत. या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या निमित्ताने सिराज आणि गिलचे कसोटी पदार्पण ठरणार आहे. मोहम्मद सिराजला दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागेवर संधी देण्यात आली आहे. तर शुभमन गिलला पृथ्वी शॉच्या जागी संधी मिळाली आहे. तर दुसऱ्या सामन्यातही केएल राहुलला संधी देण्यात आलेली नाही.

टेस्टसाठी भारताने टीममध्ये चार बदल केले. शुभमन गिल, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे. पृथ्वी शॉ आणि ऋद्धीमान साहा यांना डच्चू देण्यात आला. तर विराट पितृत्वाच्या रजेवर गेल्यामुळे आणि मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्यामुळे या सीरिजमध्ये खेळणार नाही. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने टीमच्या या निवडीवर निशाणा साधला आहे. भारतीय टीम खेळाडूंमध्ये असुरक्षितता निर्माण करत आहे, असं गंभीर म्हणाला आहे.

‘ऋद्धीमान साहा च्या बदली ऋषभ पंत ला घेणं हे दोन्ही विकेट कीपरसाठी अनुचित आहे. साहा याला एक टेस्ट मॅच खेळवली आणि त्यानंतर त्याला बाहेर करण्यात आलं, हे दूर्दैवी आहे. जर पंत दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टमध्ये अपयशी ठरला तर तुम्ही काय करणार? मग पुन्हा साहा टीममध्ये येणार? खेळाडूंना बोलल्यामुळे नाही, तर तुम्ही काय करता त्यामुळे सुरक्षित वाटतं. सध्याच्या टीमला हे करता आलेलं नाही, त्यामुळे टीम अस्थिर वाटत आहे. कोणताही खेळाडूमध्ये सुरक्षित असल्याचा भाव नाही. खेळाडूच्या मनात आपलं स्थान सुरक्षित असणं महत्त्वाचं असतं. देशासाठी खेळणारा प्रत्येक खेळाडू प्रतिभावान असतो,’ अशी प्रतिक्रिया गंभीरने स्पोर्ट्स टुडेशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!