मुंबई : ‘गली बॉय’फेम बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर सिद्धांतने स्वत: ला राहत्या घरीच क्वारंटाइन केले आहे. अलीकडे रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, संजय लीला भन्साळी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. याशिवाय अभिनेत्री तारा सुतारियालादेखील कोरोना विषाणूची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे.
या आठवड्यात बॉलीवूडमध्ये अभिनेता रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे कोरोना पॉझीटिव्ह आढळले. या पाठोपाठ मनोज बाजपेयी, आषिश विद्यार्थी आणि तारा सुतारियालादेखील कोरोनाची लागन झाल्याची बातमी समोर आली आहे. सिद्धांत राजस्थानात आपल्या ‘फोन बूथ’ चित्रपटासाठी शुटिंग करत होता.
कोरोना लागण झाल्यनंतर सिद्धांतने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे की, “तुमच्या चिंतेबद्दल धन्यवाद. मी कोविड- १९ पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. सध्या माझी प्रकृती ठिक आहे. मी स्वत: ला घरात क्वारंटाइन केलं आहे. मी सर्व सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करत असून डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. मी कोरोनाचा सकारात्मकतेने सामना करत आहे.”
महत्वाच्या बातम्या
- ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन लवकरच येणार भारत भेटीला
- हॉटेल, पानटपरी, छोट्या व्यावसायिकांना परवानगी द्या, ‘वंचित’ची मागणी
- ‘लग्न होत नसेल तर शादी डॉट कॉमवर जा, त्यासाठी पत्रकार परिषद कशाला घेतोस’
- चेहऱ्याप्रमाणे हातांना देखील बनवा सुंदर
- ‘ठाकरेंचा सुसंस्कृतपणा ऐकायचा असेल तर जयदेव ठाकरेंना किंवा सोनू निगमला विचारा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

