मुंबई – शिवसेना व राणे कुटुंबीय पुन्हा आमनेसामने आले आहेत. सचिन वाझे प्रकरणात आमदार नीतेश राणे यांनी युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्यावर व्यक्तिगत आरोप केल्यानं या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे.
काल नीतेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. वाझे हे सट्टेबाजांकडून पैसे घेतात आणि त्यातील वाटा शिवसेनेच्या नेत्यांना जातो, असा आरोप त्यांनी केला होता. युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांचं नावही त्यांनी घेतलं होतं. वाझे आणि सरदेसाई यांचे संबंध आहेत. त्यांच्यातील संभाषणाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.
यानंतर वरुण सरदेसाई यांनी देखील काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या भूतकाळातील काही राजकीय घटनांवर बोट ठेवलं. सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांच्यावर अपहरण आणि मर्डरचे गुन्हे असल्याचं सांगत त्यांना प्रत्युत्तर दिलं.
त्यांनी जे आरोप केलेत, ते सिद्ध करावेत नाही तर कायदेशीर प्रक्रियेला तयार राहावे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केलेत. ते सगळे आरोप तथ्यहीन असून, त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकत आहे, असंही वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट केलंय.
ठाकरेंचा नातेवाईक वरून खालून सरदेसाई सारखा बेवडा, जूगारडा, मटका छाप म्हणतो अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार पण मुळात त्यासाठी अब्रू असावी लागते. ठाकरे म्हणे सुसंस्कृत, ह्यापेक्षा मोठा विनोद नाही. ठाकरेंचा सुसंस्कृतपणा ऐकायचा असेल तर जयदेव ठाकरेंना किव्हा सोनू निगमला विचारा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 16, 2021
दरम्यान, आता या प्रकरणात माजी खासदार निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. शिवसेनेवर त्यांनी तोफ डागली असून यामुळे राणे-शिवसेना वाद आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. ठाकरेंचा नातेवाईक वरून खालून सरदेसाई सारखा बेवडा, जूगारडा, मटका छाप म्हणतो अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार पण मुळात त्यासाठी अब्रू असावी लागते. ठाकरे म्हणे सुसंस्कृत, ह्यापेक्षा मोठा विनोद नाही. ठाकरेंचा सुसंस्कृतपणा ऐकायचा असेल तर जयदेव ठाकरेंना किंवा सोनू निगमला विचारा असं राणे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- वाझे सट्टेवाल्यांकडून खंडणी उकळतो आणि वरुण सरदेसाई त्यातून हिस्सा घेतो – नितेश राणे
- पडळकर फडणवीसांना म्हणाले ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’; नेटकऱ्यांनी धु-धु धुतले !
- परस्त्री सोबत शॉपिंगला जाणे पडले महागात, भरबाजारात अदनानची आयशाने धुलाई केली
- …म्हणून आगामी निवडणूकीत कुठल्याही पक्षासोबत युती नाही; मायावतींचा स्वबळाचा नारा
- राज्यात 18 ते 20 मार्च दरम्यान पावसाची शक्यता, जाणून घ्या कुठे पडू शकतो पाऊस?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

