Share

गजानन महाराज मंदिर पुन्हा बंद ! कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर घेतला निर्णय

Published On: 

औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे शहरातील गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिर पुढील सात दिवसासांठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. बुधवार ३ मार्च पासून ते गुरुवार ७ मार्च पर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. शुक्रवारी साजरा होणारा श्री गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव यंदा सार्वजनिकरीत्या साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शेगाव येथील मदिंर विश्वस्त मंडळाच्या वतीने गेल्या ४० वर्षापासुन गजानन महाराज प्रकट दिन गारखेडा येथील गजानन महाराज मंदिरात साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमिवर हा सोहळा सार्वजनिक रित्या साजरा केला जाणार नाही. दरवर्षी महाराजांच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. परंतु शहरात सध्या कोरोनाचा वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्येत होत असलेली दिवसेंदिवस वाढ यामुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकांची गर्दी वाढली तर कोरोना संसर्ग फैलावु शकतो तेव्हा अशा परिस्थितीत या महोत्सवाचे सार्वजनिक आयोजन करणे हे भक्तांच्या आरोग्यासाठी योग्य नाही आणि म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मंडळाने दिली आहे. या वर्षी सर्व भक्तांनी घरूनच श्रींची आराधना करावी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे , असे आवाहन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण वक्ते यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!