🕒 1 min read
Sanjay Nirupam On Gajanan Kirtikar | मुंबई : काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्याकडून खासदार गजानन किर्तीकर यांचा निकम्मा असा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी सोडल्यानंतर संजय निरुपम यांनी हे वक्तव्य केले आहे. गजानन किर्तीकर यांच्या विरोधात निरुपम यांनी आंदोलन केले. बाईक रॅली काढण्याचा त्यांचा विचार होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. किर्तीकर यांच्या राजीनाम्यासाठी निरुपम यांनी हे आंदोलन केलं होतं.
संजय निरुपम म्हणाले, “आमची एक बाईक रॅली होती. गजानन किर्तीकर जे आमच्या विभागाचे खासदार आहेत. ते एकदम निष्क्रीय आणि निकम्मा खासदार आहेत. गेल्या साडेतीन वर्षापासून ते परिसरात कुठेही फिरले नाहीत. मतदार संघात फिरले नाहीत. मतदारांना भेटत नाहीत. सध्या ते पक्ष सोडून शिंदे गटात गेले. ते पैसे घेऊन गेले, ईडीची केस आहे का?, हा त्यांचा विषय आहे.”
यावेळी निरुपम यांनी किर्तीकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “जे खासदार साडेतीन वर्षापासून निष्क्रीय आहेत, अशा खासदाराला आता पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी राजीनामा दिला पाहीजे. त्यांच्याकडून राजीनामा मागण्यासाठी आज आमची बाईक रॅली होती. मात्र मला समजत नाही मुंबई पोलीस घाबरते कशाला, रात्रीपासून माझ्या घराखाली पोलिसांचा फौजफाटा आहे. सगळे पोलीस प्रशासन रॅली होऊ न देण्यासाठी जागृत होती. मला कुठल्याही प्रकारचे पत्र न दाखवता घरातून परडून पोलीस स्टेशनमध्ये नेले,” असे संजय निरुपम म्हणाले.
ठाकरे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शुक्रवारी मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कीर्तीकर यांचे पक्षात स्वागत केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करणारे नेते खासदार गजानन कीर्तिकर होते. कीर्तीकर शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देणाऱ्या खासदारांची संख्या तेरा झाली आहे. गजानन कीर्तिकर हे उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेनेचे खासदार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Travel Guide | गुलाबी थंडीमध्ये उबदारपणा अनुभवायचा असेल, तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट
- Prakash Ambedkar | “ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युती करणार?”; प्रकाश आंबेडकर म्हणाले,
- Congress | भारत जोडो यात्रेमध्ये भाजपकडून अडथळे ; काँग्रेसचा आरोप
- Periods Hack | मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड्सशिवाय महिला वापरू शकतात ‘हे’ हायजिनिक पर्याय
- Gajanan Kirtikar | शिंदे गटात गेल्यावरही स्वत:ला निष्ठावंत कसं म्हणता?, प्रश्न विचारताच गजानन कीर्तिकर भडकले, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
