औरंंगाबाद : घराच्या पाठीमागील दरवाजा तोडून घरातील ७० हजार ८५० रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेणाऱ्या संतोष उर्फ मुक्या उर्फ बांग्या गणेश रामफळे (वय २२,रा.जयभीमनगर, टाऊन हॉल) याला अठरा महिन्यानंतर बेगमपुरा पोलिसांनी गजाआड केले असून त्याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी दिले आहेत.
हिमायतबाग परिसरातील मौलाना आझाद हा.सोसायटीत राहणारे सय्यद अयाज सय्यद फजलउल्ला हाश्मी (वय ३१) यांचे कुटूंबीय २ नोव्हेंबर २०१९ रोजी धार्मीक कार्यक्रमासाठी निलंगा (जि. लातुर) येथे गेले होते. तर सय्यद अय्याज हाश्मी हे एकटेच घरी होते. ७ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सय्यद अय्याज हाश्मी हे घराला कुलूप लावून मित्राला भेटण्यासाठी आझाद चौकात गेले होते.
ते रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घरी आले, त्यांनी घराचे लॉक उघडले असता, जीण्यातून कोणाचा तरी पळण्याचा आवाज आला. सय्यद अय्याज हाश्मी यांनी घराच्या पाठीमागील दरवाज्याकडे जावून पाहिले असता, चोरट्याने दरवाजा तोडुन कपाटातील ७० हजार ८५० रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकरणात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- इंग्लंड दौऱ्याआधी पाकिस्तान संघाला मोठा धक्का, ‘या’ खेळाडूने दिला राजिनामा
- साऊथॅम्प्टन शमीसाठी खास ; ‘या’ कामगिरीची केली पुनरावृत्त्ती
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

