🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे- माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने आज सकाळी ११ वाजता होत आहे.
पद्मभूषण स्व.बाळासाहेब विखे पाटील यांनी स्वतः शब्दबद्ध केलेल्या ७०० पानांच्या आत्मचरित्र प्रकाशन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी एक तासभर ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वसंधेला काल रात्रीच पंतप्रधानांनी ट्विट करून हा कार्यक्रम नक्की पाहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे यानिमित्ताने नगर जिल्ह्याचा मोठा गौरव झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी उद्या सकाळी अकरा वाजता व्हिडिओ काॅन्फरंसिंगच्या माध्यमातून श्री बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्र प्रकाशित करणार आहे. कृषी आणि सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न नेहमी स्मरणात राहतील. हा कार्यक्रम नक्की बघा.
मी उद्या सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून श्री बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्र प्रकाशित करणार आहे. कृषी आणि सहकारक्षेत्र मजबूत करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न नेहमी स्मरणात राहतील. हा कार्यक्रम नक्की बघा.
— Narendra Modi (@narendramodi) October 12, 2020
आज होणारा प्रकाशन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सोशल डिस्टसिंगचा नियम पाळुन प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच पक्षांचे विद्यमान आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:-
- शिवसेनेनं आघाडी धर्म मोडला; काँग्रेसचे नेते फोडले
- परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला, उर्वरित 85 टक्के जनतेचं काय ? – प्रकाश आंबेडकर
- कोरोनाचे एवढे मोठे संकट आले तरी दिलेल्या शब्दापासून आम्ही मागे हटलो नाही- बाळासाहेब थोरात
- मेट्रोच्या सुखाच्या प्रवासापासून वंचित ठेवण्याचे काम अहंकारी राजा,मनमौजी राजपुत्र करत आहेत
- एकनाथ खडसेंच्या आदेशाने माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
