🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : गडचिरोलीत जवानांच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केल्याच्या धक्कादायक घटनेतून देश सावरतो तोवर नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत बॅनरबाजी करत थेट सरकारलाच धमकी दिली आहे,
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाला गालगोट लागले आहे. माओवाद्यांनी सी-६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाले. एवढ्यावरच नक्षलवादी थांबले नाहीत तर त्यांनी आता बॅनरबाजी करत गडचिरोलीमध्ये रस्ते, पूल न बांधण्याची सरकारला थेट धमकी दिली आहे.
दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहिद झाल्याची घटना ताजी असताना गडचिरोलीत हा भयंकर नक्षलवादी हल्ला झाला आहे. या स्फोटानंतर नक्षलविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

