🕒 1 min read
अहमदनगर:- मुळा सहकारी साखर कारखाना हा अहमदनगर जिल्ह्यातील नामांकित कारखाना म्हणून ओळखला जातो. मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 138 अर्ज दाखल झाले होते. मात्र, 117 इच्छुकांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 21 जागांसाठी तेवढेच अर्ज राहिल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी केली आहे.
कोरोनामुळे पुढे ढकलेल्या मुळा कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. कारखान्याचा कारभार व हित लक्षात घेऊन मनाचा मोठेपणा दाखवत अनेकांनी इच्छांना मुरड घालत अर्ज मागे घेतले. 21 जागांसाठी तेवढेच अर्ज राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अर्जुन यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नावारूपास आलेल्या कारखान्याने नेहमी सभासदहित पाहिले. तालुक्याच्या अर्थकारणाचा हा कणा यापुढेही जपला जाईल. अनेक इच्छुकांनी मनाचा मोठेपणा दाखविल्याने हे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गुरु गोविंद सिंहांच्या साहस आणि बलिदानाचे स्मरण करतो’ पंतप्रधान मोदींची आदरांजली !
- कृषी कायद्यांच्या विरोधात ८० वर्षांचा योद्धा उतरणार मैदानात
- मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित; पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार
- मुलींच्या जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षणाच्या अनुदानात वाढ
- वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करा : आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
