🕒 1 min read
नवी दिल्ली : गेल्या कित्येक दिवसांपासून केंद्र सरकारने केलेल्या तिन्ही कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी आणि केंद्र सरकारच्या चर्चा निष्फळ ठरत आहे. सरकार चर्चेला तयार आहे. पण कृषी कायदे रद्द केले पाहिजेत त्यानंतरच चर्चा असे शेतकऱ्यांची मागणी आहे.
या दरम्यान शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना आदरांजली वाहिली. गुरु गोविंद सिंहानी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केलं आणि आयुष्यभर ते आपल्या सिध्दान्तावर ठाम राहिल्याचं पंतप्रधानांनी सागितलं.
I bow to Sri Guru Gobind Singh Ji on the pious occasion of his Parkash Purab. His was a life devoted to creating a just and inclusive society. He was unwavering when it came to upholding his principles. We also recall his courage and sacrifices. pic.twitter.com/eBn7H9uYXO
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून गुरु गोविंद सिहांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, प्रकाश पर्वाच्या या पवित्र क्षणी मी गुरु गोविंद सिंहांना नमन करतो. त्यांनी आपले जीवन न्यायसंगत आणि समावेशी समाजाच्या निर्मितीसाठी समर्पित केलं. ते आपल्या सिध्दान्तावर ठाम राहिले. या प्रसंगी आम्ही त्यांचे साहस आणि बलिदानाचे स्मरण करतो.
The Guru Sahibs have a special Kripa on me that the 350th Parkash Purab of Sri Guru Gobind Singh Ji took place during the tenure of our Government. I recall the grand celebrations in Patna, where I also had the opportunity to go and pay my respects. pic.twitter.com/BNElOBj8hk
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2021
शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंहांनी 1699 साली बैसाखीच्या दिनानिमित्त खालसा पंथाची स्थापना केली होती. त्यांनी जीवनभर अन्याय, अधर्म, अत्याचाऱ्याच्या विरोधात लढा दिला. हिंदू कॅलेंडरनुसार, गुरु गोविंद सिंहांचा जन्म पौष महिन्यात शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीमध्ये झाला होता. त्यांनी ‘वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतह’ ही खालसा वाणी शिख समाजाला दिली.
दरम्यान, पंजाब मध्ये शिखांच्या सर्वोच्च संस्था शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने (SGPC) पंतप्रधान नरेंद्र मोदींना सिख गुरु तेगबहादुर यांच्या 400व्या प्रकाश पर्वासाठी निमंत्रित न कराण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून पंजाबमध्ये राजकारण सुरु झाले असून आम आदमी पार्टी, शिरोमणि अकाली दल यांनी या निर्णयाला पाठींबा दिला आहे. भाजप आणि कॉंग्रेस ने मात्र यावर आक्षेप घेतला आहे. हा कार्यक्रम एप्रिल महिन्यात पार पडणार असून याची तयारी नोव्हेंबर पासूनच सुरु झाले आहे. यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांच आयोजन करण्यात येत आहे. पंजाब सरकार द्वारा या पार्श्वभूमीवर तयारी सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठा निर्णय : महाराष्ट्र विधानमंडळ जनतेसाठी खुले होणार…
- कृषी कायद्यांच्या विरोधात ८० वर्षांचा योद्धा उतरणार मैदानात
- मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित; पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार
- मुलींच्या जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षणाच्या अनुदानात वाढ
- वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करा : आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
