Share

दुचाकीवरुन पडलेल्या भावी नवरदेवाचा उपचारादरम्यान मृत्यू

Published On: 

औरंंगाबाद : दुचाकीवरून पडलेल्या तरुणाचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात पडेगाव परिसरातील साईनगरजवळील रेल्वे रुळाजवळ घडला होता.
नीरज ज्ञानेश्वर गडवे (वय २३, रा. तरतगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, ह. मु. साईनगर, पडेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

नीरज हा शहरातील एका कंपनीत मार्केटींगचे काम करत होता. त्याचे नुकतेच लग्न ठरले होते. गुरुवारी सायंकाळी तो दुचाकीने जात असताना साईनगर जवळील रेल्वे रुळाजवळ तो अचानक दुचाकीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला.

त्याला प्रथमोपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला घाटीत हलविण्यात आले होते. पण सकाळी दहाच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद छावणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!