🕒 1 min read
मुंबई : भारतीय इंधन तेल कंपन्यांनी आज जाहीर झालेल्या दरपत्रकानुसार पेट्रोल आणि डिझेलबाबत (Fuel Price) लोकांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात पुन्हा घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर आहेत.
आज बुधवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. तर एक लीटर डिझेलचा भाव ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०३.९७ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये इतके आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये, डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये आहे. कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये असून पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे.
दरम्यान, दिवाळीच्या अगोदर इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती ५ आणि १० रुपयांनी कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. यानंतर आता भाजपनेही राज्य सरकारने इंधनाची दरवाढ कमी करण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र अद्याप पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याबाबत राज्य सरकारकडून कोणताही दिलासा दिला नाही.
महत्वाच्या बातम्या
- आंदोलन रबरासारखं, जास्त ताणल्यास तुटतं; सदाभाऊ खोत यांचं सूचक वक्तव्य
- शरद पवारांनी घेतली शशिकांत शिंदेंची भेट; बंद दाराआड चर्चा
- ओबीसींनी राजकीय आरक्षण ठाकरे सरकारमुळेच गमावले; भाजपचा आरोप!
- वक्फ जमिन प्रकरण; जिल्हा सत्र न्यायालयाकडून खा. इम्तियाज जलील यांची निर्दोष मुक्तता
- तिरुपती एक्सप्रेस रद्द; औरंगाबादहून जाणाऱ्या हजारो प्रवाशांमध्ये नाराजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
