मुंबई : पेट्रोल आणि डिझेल दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. यातच आता आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये प्रत्येकी 35 पैशांची वाढ करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात आधीच सर्व महागळे असताना दिवसेंदिवस इंधनात होणारी वाढ चिंताजनक आहे.
मुंबईत पेट्रोल दराने ११५ रुपयांचा टप्पा ओलांडला. मुंबईत पेट्रोल दर ११५.१५ रुपये असून, डिझेल दर १०६.२३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलसाठी १०९.३४ रुपये, तर डिझेलसाठी ९८.०७ रुपये मोजावे लागत आहेत. देशातील जवळपास सर्वच मोठय़ा शहरांत पेट्रोलने शंभरी पार केली आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडासह अनेक भागांत पेट्रोलने सर्वाधिक म्हणजे १२० रुपयांचा टप्पा ओलांडला.
देशाच्या अनेक शहरांमध्ये यावेळी पेट्रोल दर 120 लीटरच्या जवळपास पोहोचला आहे. देशातील बहुतांश ठिकाणी पेट्रोल १०० प्रति लिटरच्या पुढे विकले जात आहे. त्याच वेळी, डिझेलबद्दल बोलायचे झाले तर, मध्य प्रदेश, राजस्थान, ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार, कर्नाटक, केरळ, गुजरात, गोवा यासह इतर अनेक राज्यांमध्ये दर १०० च्या पुढे गेले आहेत.