मुंबई: महागाईमुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ होतच असल्याचे चित्र दिसत आहे. यातच आता पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले असून, त्यानुसार डिझेलच्या दरात २५ पैशांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोलचे दर स्थिर आहे.
डिझेलच्या दरात वाढ झाली मात्र गेल्या २२ दिवसात पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली नाही. डिझेलच्या दरांत गेल्या 4 दिवसांत तीन वेळा वाढ झाली आहे. तर सप्टेंबरमध्ये आतापर्यंत डिझेलच्या किमतींमध्ये 70 पैशांची वाढ करण्यात आली आहे.
पेट्रोलचे भाव-
मुंबई -१०७.२६ रुपये
दिल्ली -१०१.१९ रुपये
चेन्नई- ९८.९६ रुपये
कोलकाता- १०१.६२ रुपये
भोपाळ -१०९.६३ रुपये
बंगळुर -१०४.७० रुपये
डिझेलचा भाव-
मुंबई- ९६.९४ रुपये
दिल्ली -८९.३ २रुपये
चेन्नई- ९३.९३ रुपये
कोलकाता – ९२.४२ रुपये
देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, केरळ, बिहार, पंजाब, लड्डाख, सिक्किम आणि दिल्ली या ठिकाणी पेट्रोलने शंभरी पार केली आहे. इंधन दरवाढीचा परिणाम दैनंदिन जीवनातील सर्वच गोष्टींवर दिसून येत आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दक्षता व गुणनियंत्रण मंडळ कार्यालय होणे ही मराठवाड्यासाठी अभिमानास्पद बाब’
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- वरती सत्तेत एकत्र, पण खाली कार्यकर्त्यांची डोके फोड सुरूच- विजय शिवतारे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

