🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेच्या नव्या प्रवक्त्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेने नवी यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे व भाजपाला सडेतोड उत्तर देणारे, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे शिवसेनेनं आक्रमक बाणा कायम ठेवल्याच्या चर्चा सुरु आहेत.
परंतु राजकारणातील नवा ‘कोल्हापुरी पॅटर्न’ देशाला दाखवणारे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने प्रवक्तेपदापासून दूर राहिले आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यासह खासदार अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना नव्या यादीत स्थान मिळालेले नाही.
खासदार धैर्यशील माने हे वक्तृत्व शैलीसाठी कोल्हापूरसह राज्यभरात प्रसिद्ध आहेत. आपल्या तडफदार भाषणांनी धैर्यशील माने यांनी यापूर्वी अनेक सभा गाजवल्या आहेत. २०१९ मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर इस्लामपुरातील त्यांचं भाषण विशेष चर्चेत राहिलं होतं.
कारण उभ्या पावसात धैर्यशील माने यांनी न थांबता भाषण केलं होतं. जोरदार पावसाला जणू धैर्यशील माने यांनी धारदार भाषणाने उत्तर दिलं होतं. परंतु आता त्यांना प्रवक्ते पदावरून डच्चू मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कामिलीची नाराजी पाहायला मिळत आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर, शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, आनंद दुबे यासारख्या नव्या नेत्यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी वर्णी लावल्याचं चित्र आहे. याशिवाय अॅड. अनिल परब, सुनील प्रभू, किशोरी पेडणेकर यासारख्या प्रवक्त्यांना पुनर्नियुक्त करण्यात आले आहे.
तर नाराज नेते भास्कर जाधव यांनाही प्रवक्तेपद देण्यात आले आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुका लक्षात घेत विधानपरिषद आमदार अंबादास दानवे यांनाही प्रवक्तेपदाची धुरा मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अनिल देशमुखांवरील समिती म्हणजे जनतेला एप्रिल फूल बनवण्याचा प्रकार’
- आफ्रिकेच्या खेळाडूंचा पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून भारतात येण्याचा निर्णय
- ‘आरएसएसचे लोक देशभक्त आहेत आणि इतर सर्व देशद्रोही आहेत’
- ‘खटल्याच्या निकालामुळे मी व्यक्तिश: निराश, मात्र मला निवांत झोप लागेल’
- बंडखोरांनी अवताडे-भालकेंची डोकेदुखी वाढवली, पंढरपूर पोटनिवडणुकीतील चुरस वाढली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

