बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील अत्याचाराच्या आरोपाची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. शिरुर कासार इथं जेव्हा धनंजय मुंडे दाखल झाले त्यावेळी जेसीबी मशीनमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.
त्याचबरोबर एक भला मोठा हार क्रेनच्या माध्यमातून त्यांना घालण्यात आला. कार्यकर्त्यांकडून झालेल्या या अभूतपूर्व स्वागतामुळे धनंजय मुंडे भारावल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं आहे. यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दिलं आहे. दरम्यान, रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यानंतर मुंडे यांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. मात्र, यामुळे मुंडे यांची प्रतिमा मलीन झाल्याचे पहायला मिळत आहे. विरोधक मुंडे यांच्यावर विविध आरोप करत आहेत. विरोधकांनी मुंडे यांना क्लीन चीट दिली नसल्याचे स्पष्ट चित्र आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांच्या आरोपावर काल भाष्य केले होते. ‘तो विषय बऱ्यापैकी मागे पडलेला आहे. तरीही याच्यावर परत परत बोलावं लागू नये म्हणून तुम्ही आलाच आहात, तर सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्त्विकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी कधीही करू शकत नाही’, असं पंकजा म्हणाल्या. विशेष म्हणजे पंकजा यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी भाऊ धनंजय मुंडे यांचे नावही घेतलं नाही.
महत्वाच्या बातम्य
- ‘दिल्लीतील परिस्थितीला जबाबदार धरून आता अमेरिकेच्या जो बायडन यांचा राजीनामा घेणार का ?’
- ‘मोदींच्या द्वेषापोटी काँग्रेस शेतकऱ्यांच्या आडून हिंसाचार घडवत आहे’
- ‘दिल्लीत पोलिसांनीच हिंसा केली, ती सुद्धा भाजपाच्या सरकारच्या सांगण्यावरुन !’
- ‘शेतकरी आंदोलना दरम्यान परिस्थिती हाताबाहेर गेली, हे सुद्धा गुप्तचर यंत्रणेचं अपयश’
- दिल्लीतील चिघळलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गृहमंत्रालयाने उचलले महत्वाचे पाऊल !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

