औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची भीती वर्तवण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेत लहान बालकांना तसेच ज्यांना आत्तापर्यंत कोरोना झालेला नाही अशा नागरिकांनाही बाधा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरात ७० टक्के लसीकरण झाले तर तिसर्या लाटेची भीती राहणार नाही असे मत प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केले आहे. मात्र लसींच्या तुटवड्या अभावी शहरात लसीकरणाला वारंवार ब्रेक लागत आहे.
जुलै महिन्यात मागील तीन दिवसांपासून ग्रामीण भागातील रुग्णांची रोजची संख्याही कमी आढळून येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आता कोरोना लसीकरणाच्या मोहिमेने वेग घेतला होता. नागरिक रांगा लावून लस घेत होते. मात्र लसीकरणासाठी मुबलक लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने या मोहिमेत वारंवार व्यत्यय येत आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेला रोखण्यासाठी किमान ७० टक्के नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक असल्याचे पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी यापूर्वीच म्हटले आहे.
लसींचा साठा संपल्यामुळे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. गुरुवारी रात्री उशिरा १५ हजार लसींचा साठा मनपास प्राप्त झाला. मात्र दोनच दिवसात हा साठा संपला. त्यामुळे लसीकरण मोहीम पुन्हा एकदा संकटात सापडली आहे. यापूर्वी देखील चार दिवस लस शिल्लक नसल्याने लसीकरण केंद्र बंद होते. आता पुन्हा एकदा नव्याने लसींचा पुरवठा कधी होईल, याबाबत काहीही सांगता येणार नाही. जोपर्यंत राज्य शासन लसींचा साठा सुरळीतपणे करत नाही तोपर्यंत परिस्थिती अशीच राहिल. अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- …अन्यथा मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा लोकआंदोलन; संभाजीराजेंचा पुन्हा राज्य सरकारला इशारा
- स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरण: ठाकरे सरकारच्या विरोधात अभाविपचे पुण्यात तीव्र आंदोलन
- धनंजय मुंडेंकडून ऊसतोड मजुरांना दिलासा, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळासाठी २० कोटींची तरतूद
- प्रणव मुखर्जींच्या मुलाचा तृणमूलमधील प्रवेश कॉंग्रेससाठी धोक्याची घंटा
- आणखी एका निवडणुकीत आता शिवसेना-राष्ट्रवादीची युती, तर काँग्रेस पडली एकाकी !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

