Share

आणखी एका निवडणुकीत आता शिवसेना-राष्ट्रवादीची युती, तर काँग्रेस पडली एकाकी !

Published On: 

🕒 1 min read

अकोला : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपसोबत दोन दशकांहून अधिक काळ असलेली मैत्री तोडली. यानंतर, शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. तर, सर्वाधिक आमदार येऊन देखील भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं आहे.

महाविकास आघाडी आल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली असून आता त्याचा परिणाम येणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसह इतर स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये देखील होत आहे. कुठे या तिन्ही पक्षांमध्ये बेबनाव आहे तर कुठे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हातमिळवणी केली जात आहे.

दरम्यान, काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र युती करून लढतील असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केलं होतं. अहमदनगर महापालिका महापौर निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीची नांदी झाली होती. आता अकोल्यात पुन्हा राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याचं समोर आलं आहे.

अकोला जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यासाठी शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांची बैठक होऊन दोघात युती झाली. त्यानुसार 9 जागांवर शिवसेना तर 5 जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या. तर, काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असून सर्वाधिक यश संपादन करण्याचा विश्वास देखील स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी तथा पंचायत समितीच्या 28 जागांसाठी 19 जुलैला मतदान होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!