🕒 1 min read
पटना- नितीश कुमार सरकार, बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील जनतेला दिलेले मोफत कोरोना लशीचे आश्वास पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. आजपासून खासगी रुग्णालयांतून देण्यात येणाऱ्या कोरोना लशीचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल, असे बिहार सरकारने म्हटले आहे.
देशात आजपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बिहारमध्ये खासगी रुग्णालयात देखील करोनाची लस मोफत दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.
Vaccination will be absolutely free in the entire Bihar state. Such facility will be made available even at private hospitals, it will be facilitated by the state government: Bihar Chief Minister Nitish Kumar #COVID19Vaccine pic.twitter.com/t0cVKG7pH9
— ANI (@ANI) March 1, 2021
“पूर्ण बिहारमध्ये करोनाची लस पूर्णपणे मोफत दिली जाईल. खासगी रुग्णालयांमध्ये देखील मोफत करोना लसीकरणाची सेवा उपलब्ध करून दिली जाईल. याचा पूर्ण खर्च राज्य सरकारकडून उचलला जाईल”, अशी घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
दरम्यान,बिहारमधील निवडणुकांवेळी अशा प्रकारचं आश्वासन देखील नितीश कुमार यांनी दिलं होतं. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, बिहारमध्ये मोफत लस मिळू लागल्यावर आता महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीने मोफत लस देण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे.
दरम्यान,केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांना कोरोनाविरोधातील लस विकण्यासाठी 250 रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे कमी किमतीत ही लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनाविरोधातील लस सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत मिळणार आहे. खासगी रुग्णालयात कोरोनाविरोधातील लशीचा एक डोस हा 150 रुपये तर सेवा शुल्क 100 रुपये असा दर केंद्र सरकारने निश्चित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- संजय राठोड यांनी सोडलेल्या वनमंत्रीपदावर काँग्रेसचा डोळा ?
- ‘आप’चे अनोखे आंदोलन, नाल्यावर पालिकेचा दशक्रिया करून पिंडदान
- ‘अब होगी हलक्रांती’, ४० लाख ट्रॅक्टर घेऊन तयार रहा; टिकैत यांनी दिल्या सूचना
- सायकलवर विधानभवन गाठत काँग्रेसने नोंदवला इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध !
- देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण द्या; आठवलेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
