Share

कुख्यात गुन्हेगाराची हत्या करणारे आणखी चार जण गजाआड

Published On: 

औरंंगाबाद : एमआयडीसी वाळूज परिसरातील कुख्यात गुन्हेगार विशाल उर्फ मड्या किशोर फाटे (वय २६, रा.वडगाव कोल्हाटी) याची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या चार जणांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली.

अटकेत असलेल्या दिपक तुकाराम प्रधान (वय २९), किरण सुदाम वाघ (वय २८, दोघे रा. निरंकार नगर, वडगाव कोल्हाटी), राहुल पंढरीनाथ विटेकर (वय २९, रा. गंगोत्री पार्क, वडगाव कोल्हाटी) आणि महेश हिरालाल शिंगोटे (वय २८, रा. लक्ष्मी पार्क, कमळापूर) या चौघांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम. कादरी यांनी गुरुवारी (दि.२७) दिले.

मयत विशाल उर्फ मड्डया फाटे याचा भाऊ अभिजित फाटे (वय १७) याने फिर्याद दिली. त्यानूसार, आरोपींविरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी प्रथम अजय प्रधान, सचिन उर्फ गोट्या प्रधान आणि आतिष काळे या तिघांना अटक केली. तर न्यायालयाने त्यांना २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!