मुंबई : विधानपरिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले आहेत.
अशातच आता कायदेतज्ञ अॅड असीम सरोदे यांनी ट्वीट च्या माध्यमातून ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या चार चुका झाल्या असल्याचं त्यांनी या ट्वीट च्या माध्यमातून म्हटलं आहे. स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजण्याची चूक उद्धव ठाकरे यांनी केली असल्याचं असीम सरोदे याचं म्हणण आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदींना अटल जी समजण्याची आणि शरद पवार यांना मित्र समजण्याची चूक उद्धव ठाकरे यांनी केली असं सरोदे म्हणाले आहेत.
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना अडचणीत आली असल्याच्या टीका अनेकदा होत असतात. मात्र असीम सरोदे (Asim Sarode) यांनी देखील याबाबत उद्धव ठाकरे यांची कानउघडणी केली आहे. संजय राऊत यांना चाणक्य समजण्याची चूक उद्धव ठाकरे यांनी केली असल्याचा टोला सरोदे यांनी लगावला आहे.
या ट्वीट ला शिवसैनिकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सध्या राजकीय वर्तुळात आलेल्या वादळाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची ठाम प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळ शरद पवार (Sharad Pawar) मोठा भूकंप आणणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाविकास आघाडीच सरकार कोसळणार का? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणं महत्वाच ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


