Share

Deepali Sayed : विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, दिपाली सय्यद म्हणाल्या…

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण मोठा खेळ बनल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या गटात पडण्याच्या छायेत आहेत. एकनाथ शिंदे गटाने मॅजिक फिगर 37 वर पोहोचल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकरही शिंदे गटात दाखल झाले आहेत. आज सकाळी शिवसेनेचे दोन आमदार मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर गुवाहाटी हॉटेलमध्ये पोहोचले. जर शिंदे गटात 37 आमदार झाल्यास हा आकडा दोन तृतीयांश होईल आणि त्यानंतर पक्षांतरविरोधी कायदा शिंदे कॅम्पला लागू होणार नाही. एकनाथ शिंदे आधीच भाजपसोबत सरकार स्थापन करण्यावर ठाम आहेत. शिवसेनेच्या आमदारांची संख्या हळूहळू कमी होत आहे. दरम्यान शिवसेनेच्या आक्रमक नेत्या दिपाली सय्यद यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू”, अशी भूमिका दिपाली सय्यद यांनी घेतली आहे.

यापूर्वी दिपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर भाष्य केले होते.  “माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या वनवासात कायम राहील. शिवसैनिकांनो रडायचं नाही लढायचं. आपले मत शिवसेनेला कायम राहील. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल, असे दिपाली सय्यद म्हणाल्या होत्या.

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकीय संकट हे चित्रपटाच्या स्क्रिप्ट पेक्षा कमी नाही. इथे सूड, बंड आणि नाटक हेच सगळं आहे. शिवसेनेचे आमदार दीपक वसंत केसरकर यांनी देखील उद्धव ठाकरे यांना अल्टिमेटम दिला होता. त्यांचे म्हणणे न ऐकल्यास आपण मार्ग काढू, असे त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान आज ते गुवाहाटीत दाखल झाले.

खरे तर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे दीपक केसरकर यांनाही शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी संबंध तोडून भाजपशी हातमिळवणी करावी, असे वाटते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ त्यांचे सरकार गमावत नाहीत, तर त्यांचा पक्ष शिवसेनाही कमकुवत होत आहे. पहिल्या दोन तृतीयांश आमदारांनी बंडखोरीची भूमिका घेतली आहे. आता काही खासदारही पक्ष सोडू शकतात, अशा बातम्या येत आहेत. खासदार राजेंद्र गाविल, भावना गवळी आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे हे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!