Share

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना कोरोनाची लागण ; एम्स रुग्णालयात दाखल

Published On: 

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे.

कोरोनाच्या अशा आज भारताचे माजी पंतप्रधान आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मनमोहनसिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोन चाचणीचा अहवाल काही वेळा पूर्वी प्राप्त झाला यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर सध्या कोरोनाचे उपचार सुरु करण्यात आले असल्याची देखील माहिती मिळत आहे.

दरम्यान, कालच कोरोना संकटाच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एक पत्र पाठवले होते. यामध्ये कोरोना लसीकरणात वाढ करण्यात यावी, ४५ वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांनाही लसीकरण करण्याची परवानगी देण्यात यावी, अशा विविध पाच सूचना करण्यात आल्या होत्या. तसेच कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे, यामध्ये किती लोकांना आतापर्यंत लस देण्यात आली, ही आकडेवारी न पाहता लोकसंख्येच्या किती टक्के लोकांना लस देण्यात आली, हे पहावे असे देखील या पत्रात म्हटले आहे. वेगवेगळ्या लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना सरकारच्या वतीने किती ऑर्डर देण्यात आली आहे, राज्यांना किती प्रमाणात लस उपलब्ध होणार आहे, याचे पुढील सहा महिन्याचे नियोजन करण्याची सूचना देखील त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!