🕒 1 min read
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून राज्य आणि देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या या लाटेत रुग्णसंख्येचा विस्फोट होताना दिसत आहे यामध्ये अनेक बॉलीवूड, मराठी मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तीसह राजकीय नेत्यांना देखील कोरोनाने गाठले आहे. यामध्ये आता . देशाचे माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे नेते एचडी देवगौडा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
यावेळी एच डी देवगौडा यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली. ‘माझी पत्नी चेन्नम्मा आणि मी कोविड -१९ ची चाचणी केली आहे. त्यामध्ये आम्ही पॉझिटिव्ह आलो असून आम्ही कुटुंबातील इतर सदस्यांसह स्वत:ला वेगळं करत आहोत. असेत्यानी यावेळी सांगितले.
My wife Chennamma and I have tested positive for COVID-19. We are self-isolating along with other family members.
I request all those who came in contact with us over the last few days to get themselves tested. I request party workers and well-wishers not to panic.— H D Devegowda (@H_D_Devegowda) March 31, 2021
याच बरोबर गेल्या काही दिवसांपासून आमच्याशी संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी त्यांची चाचणी घ्या. मी कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना घाबरू नका अशी विनंती करतो’. असे आवाहन देखील त्यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- आज बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते – नितेश राणे
- शिवसेनेच्या नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; नाराज भास्कर जाधवांची लागली वर्णी
- ‘परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करुन नाचताना शरम वाटायला पाहिजे’
- एचडीएफसी बँक ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग सुविधा वापरताना अडचणी; बँकेने दिल आश्वासन
- ‘गोकुळ’चा संचालक व्हायचं असेल तर एका दमात दहा लिटर दूध काढून दाखवा – राजू शेट्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

