🕒 1 min read
मुंबई: बुधवारपासून औरंगाबाद जिल्हाभरात लॉकडाऊन लागणार असे घोषित करण्यात आले होते. परंतु मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या लोकप्रतिनिधी सोबतच्या बैठकीत विविध प्रश्नावर चर्चा झाली. यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री आणी मुख्य सचिव यांच्या सोबत झालेल्या चर्चेअंती लॉकडाऊन स्थगित करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी रात्री दहा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
त्या सूचनांचे पालन करण्यासाठी अवधी लागणार असल्याने मंगळवारी रात्री लागणारा लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनला खासदार इम्तियाज जलील यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. आज (31) रोजी जलील पैठण गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा देखील काढणार होते. पुढील आदेश येईपर्यंत हा लॉकडाऊन रद्द करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यावेळी लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर AIMIMचे खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती. यावरून मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 31, 2021
‘MIM च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? संभाजीनगरमघ्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करुन नाचताना शरम वाटायला पाहिजे’ असं मनसे नेते अमेय खोपकरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
अमेय खोपकर पुढे म्हणाले की, हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे ‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे’ अशी मागणीही अमेय खोपकर यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आज बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते – नितेश राणे
- आफ्रिकेच्या खेळाडूंचा पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून भारतात येण्याचा निर्णय
- ‘आरएसएसचे लोक देशभक्त आहेत आणि इतर सर्व देशद्रोही आहेत’
- ‘खटल्याच्या निकालामुळे मी व्यक्तिश: निराश, मात्र मला निवांत झोप लागेल’
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

