Share

माजी आमदार सरदार तारासिंग यांचे निधन

Published On: 

मुंबई : भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते ते नेते असा मोठा प्रवास लाभलेले माजी आमदार सरदार तारासिंह यांची प्राणज्योत मालवली. ते सलग ४ वेळा मुंबईच्या मुलुंड विधानसभेतून निवडून आले होते. २०१९ मध्ये पीएमसी बँक वादात त्यांचे नाव आल्याने त्यांना तिकीट नाकारण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले असून ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्यावर बांद्रा येथील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनानंतर अनेक भाजप नेत्यांनी व आमदारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शोक संदेश-

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सरदार तारासिंग यांच्या निधनाने जनसामान्यांचा नेता, एक सच्चा समाजसेवक हरपला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या ४० वर्षाच्या प्रदीर्घ कार्यकाळात अतिशय प्रामाणिक आणि निष्कलंक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यामुळेच कार्यसम्राट ही उपाधी जनतेने त्यांना बहाल केली होती. त्यांचे निधन संपूर्ण भाजप परिवारासाठी धक्कादायक आहे, अशा शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

२०१९ ची निवडणूक केवळ वयामुळे ते लढले नाही, अन्यथा तितक्याच मताधिक्याने ते निवडून आले असते. पण रुग्णालयात दाखल होईस्तोवर, अखेरच्या क्षणापर्यंत ते जनसामान्यांसाठी कार्यरत राहिले. मुंबई महापालिका असो वा विधानसभा त्यांची संपूर्ण कारकीर्द ही अतिशय प्रामाणिक जनसेवक म्हणून राहिली. तख्त सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब नांदेड गुरूद्वाराचे अध्यक्ष म्हणून काम पाहताना अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी काम केले. चुकीच्या प्रथांविरुद्ध संघर्ष केला. तेथील सुवर्णकलशाचे काम पूर्ण प्रामाणिकतेने पूर्ण केले. कायम जनतेत राहणारा, एक लाडका नेता आज जनतेने गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय आणि आप्तस्वकियांच्या दुःखात सहभागी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!