🕒 1 min read
अहमदनगर: एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू आहे. वेतनवाढ केली असली तरी आंदोलक विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत त्यामुळे आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. अशातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामावर आलात तरच वेतन दिले जाईल, असा इशारा देखील दिला आहे त्यामुळे कर्मचारी पुन्हा कामावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत.
भाजप व शिवसेना युतीच्या काळात जलसंपदा मंत्री राहिलेले गिरीश महाजन यांनी एसटी कामगारांच्या आंदोलनावरून राज्य सरकारवर आरोप केले आहेत. गिरीश महाजन यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांची अचानक भेट घेतली. अण्णा हजारे यांच्या तब्येतीची चौकशी करत त्यांच्या सोबत अनेक विषयांवर चर्चा देखील केली. त्यानंतर गिरीश महाजन यांनी मध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना हे आंदोलन का चिघळत आहे यावर भाष्य केलं.
मध्यमांशी संवाद साधत असताना गिरीश महाजन म्हणाले, राज्यात महिनाभरापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सरकारला मिटवता येत नाही, हे सरकारचे अपयश आहे. भाजप-शिवसेनेचे सरकार असताना मराठा क्रांती मोर्चाची आरक्षणासाठीची आंदोलने, ओबीसींची आरक्षणासाठी आंदोलने, नाशिकहून निघालेला शेतकरी मोर्चा अशी अनेक आंदोलने झाली. मात्र, त्या त्यावेळी आम्ही सरकार म्हणून आंदोलकांशी संवाद साधत होतो. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आंदोलकांशी काही देणेघेणे नाही, अशा पद्धतीने वागत आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- ‘केंद्र सरकारने आरक्षणाचे प्रस्ताव सभागृहात मांडून त्यांना न्याय देण्याची ठाम भूमिका घ्यावी’
- ‘कामावर हजर असलेल्यांनाच पगार मिळणार’
- …तर ओमायक्रॉनचा एक रुग्ण १५-२० जणांना बाधित करु शकतो- डॉ.अमित द्रविड
- शिवेंद्रराजे भोसलेंना शशिकांत शिंदेंचा खोचक टोला; म्हणाले,’माझी शिफारस नसल्यामुळे…’
- …तरी केंद्रातील विद्यमान सत्ताधारी जीएसटीच्या प्रेमात आकंठ बुडालेत- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
