पुणे : गेले पाच महिने पुण्यासह राज्यभरात कोरोनाने हाहाकार घातला आहे. पुण्यातील जनजीवन एकबाजूला सुरळीत होत असतानाच कोरोनाच्या थैमानाचे व प्रशासनाचे व्यवस्थेचे वाभाडे निघालेले दिसून येत आहेत. पुण्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड्स उपलब्ध नाहीत. यातच, पुण्याच्या एका माजी महापौरांचा देखील बेड न मिळाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.
पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे यांचे मध्यरात्री सव्वा बाराच्या दरम्यान करोनाने ससून रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातू आहे. नुकतेच त्यांच्यात ज्येष्ठ मुलीचे आणि तरुण मुलाचे करोनाने निधन झाले आहे. एकबोटे यांना करोना झालाय हे समजताच त्यांनी अनेक रुग्णालयाशी संपर्क साधला, पण सुरुवातीला त्यांना कुठेच जागा उपलब्ध झाली नाही.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या आणखी एका भावाचे निधन
अखेर त्यांना ससून रुग्णालयात दाखल व्हावे लागले. तिथेही त्यांना योग्य उपचार मिळत नव्हता अशी बाब समोर आली. यानंतर माजी नगरसेविका मीनाक्षी ज्ञानेश्वर काडगी यांनी खासदार गिरीश बापट, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्यावर गांभीर्याने उपचार करण्यात आले.
पुण्यातील सार्वजनिक बससेवा आजपासून सुरु! जाणून घ्या नियमावली
तर, निधनानंतरही त्यांच्या अंत्यसंस्कारात अडचणी निर्माण झाल्या. निधनानंतर त्यांचं पार्थिव प्रथम कैलास स्मशानभूमीत नेण्यात आले. तिथे जागा नसल्याने त्यांना येरवडा इथं नेण्यात आले. आणि त्यानंतर कोरेगाव पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे जर माजी महापौरांनाच जर अशा परिस्थितीमधून जावे लागत असेल तर सामान्य जनतेला दाद कशी मिळणार असा गंभीर प्रश्न आता पुण्यात निर्माण होत आहे.
प्रस्तावित संचमान्यता धोरणामुळे प्राथमिक माध्यमिक शाळा धोक्यात…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

