Share

पुण्यातील सार्वजनिक बससेवा आजपासून सुरु! जाणून घ्या नियमावली

Published On: 

पुणे : गेले ५ महिने कोरोना महामारीने जगभरासह देशात देखील थैमान घातले आहे. तर, राज्यात शिरकाव केल्यापासून मुंबई, पुण्यासह अन्य जिल्ह्यात देखील कोरोनाने कहर घातल्यामुळे प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. आता, हळूहळू सर्व स्थिती हि सर्वसामान्य होत असून अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांसाठी बंद करण्यात आलेल्या पीएमपीएमएलची बससेवा पूर्ववत सुरु करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी पीएमपीची बससेवा हि गणेश चतुर्थीपासून सुरु केली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे परवानगीबाबत तशी मागणी देखील केली गेली होती. मात्र, गणेशोत्सव काळात होणारी गर्दी टाळण्यासाठी बससेवा गणेशोत्सवानंतरच सुरु होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

प्रस्तावित संचमान्यता धोरणामुळे प्राथमिक माध्यमिक शाळा धोक्यात…

त्यानुसार, आज (दि. ३ सप्टेंबर) पासुन मर्यादीत प्रमाणात पीएमपीएमएलची बससेवा सर्व सामान्यांसाठी सुरु करण्यात येत असून स्वच्छतेची व निर्जंतुकीकरणाची खास काळजी घेतली जाणार आहे. तर, प्रवाशांसाठी नियमावली जाहीर करण्यात आले आहे. एका बसमध्ये एकूण आसनक्षमतेच्या ५०% प्रवाशांनाच प्रवास करता येईल, यात एकूण २० प्रवासी असतील त्यापैकी १७ आसनावर बसू शकतात व ३ सोशल डिस्टनसिंगपाळून बसच्या मधल्या भागात उभे राहू शकतात.

Breaking News : जगप्रसिद्ध गेम ‘PUBG’ सह ११८ ऍप्सवर बंदी!

१० वर्षांखालील व ६५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना संसर्गाचा असलेला जास्त धोका बघता बसने प्रवास करता येणार नाही. प्रत्येक प्रवाशाला मास्क आवश्यक असून थर्मल गनने तापमान सुरुवातीला मोजले जाईल आणि मगच बसमध्ये प्रवेश दिला जाईल. कंडक्टर व बसचालकांना फेस शिल्ड, मास्क तसेच हात मोजे दिले जातील. तसेच, बसचालकाची जागा ही प्लास्टिक कव्हरने झाकली जाईल.

नागपूर महापालिकेतील ‘मुंढे’ करंट कायम, नवीन आयुक्तांनी बजावली ६६ कर्मचाऱ्यांना ‘शो कॉज’ नोटिस

सुरुवातीला पीएमपीएमएलने एकूण बसपैकी २५ टक्के म्हणजेच ४२१ बस पुणे,  पिंपरी-चिंचवड आणि उपनगराच्या १९० मार्गांवर चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, गर्दीच्या वेळी १२० बसेस या शटल सर्व्हिस म्हणून धावतील. सद्या एकूण ७५६ चालक आणि ८१९ कंडक्टर्सना कामावर रुजू केले जाणार आहे. या चालक, वाहकांचे देखील डेपोमध्ये तापमान मोजण्याचे व बस रस्त्यावर येण्याआधी पूर्णतः निर्जंतुकीकरणाची जबाबदारी १३ डेपोंच्या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली असून पीएमपीएमएलने बस धुण्यासाठी सुसज्ज अशी व्यवस्था निर्माण केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!