Share

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या आणखी एका भावाचे निधन

Published On: 

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे धाकटे बंधू अस्लम खान यांचे २१ ऑगस्ट रोजी निधन झाले होते. यानंतर, काल (दि.२ सप्टेंबर) रोजी त्यांच्या आणखी एका धाकट्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले. दिलीप कुमार यांचे धाकटे बंधु एहसान खान यांचे ९० व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात काल रात्री ११ वाजता अखेरचा श्वास घेतला.

एहसान खान यांच्यावर रुग्णालयामध्ये कोव्हिड-19 बरोबरच त्यांच्यावर हृदयरोग, हायपर टेन्शन आणि अल्झायमर यांसारख्या आजारावर देखील उपचार सरू होते. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिवार शोकसागरात बुडाला आहे. अस्लम खान व एहसान खान या दोघांचे देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी या दोघांना रुग्णालयात दाखल केले होते.

पुण्यातील सार्वजनिक बससेवा आजपासून सुरु! जाणून घ्या नियमावली

एहसान आणि अस्लम यांना 15 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरस संक्रमणामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन्ही भावांवर मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर जलील पारकर करत होते. आता, अभिनेता दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांना बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. गेल्या 12 दिवसात दिलीप कुमार यांच्या घरातील हा दुसरा मृ्त्यू आहे.

प्रस्तावित संचमान्यता धोरणामुळे प्राथमिक माध्यमिक शाळा धोक्यात…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!