Share

‘माजी गृहमंत्री फरार; हे देशातच नाहीतर कदाचित जगात पहिल्यांदा घडत असेल’

Published On: 

🕒 1 min read

चंद्रपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. काल आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुखांच्या घरासह इतर मालमत्तांवर धाड टाकली. त्यानंतर आज पुन्हा दुसऱ्या दिवशी आयकर विभागाने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाड टाकली आहे.

सध्या देशमुख हे गायब आहेत. ईडी त्यांचा शोध घेत असून दिवसेंदिवस त्यांच्या अडचणी देखील वाढत आहेत. ईडी, सीबीआय आणि आता आयकर विभाग यांचा भाजप गैरवापर करत आहे असा आरोप महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. याबाबत आता भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं असून त्यांनी आणि देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.

‘अनिल देशमुख यांच्यावर होत असेलल्या आयकर विभागाच्या कारवाईकडे राजकीय भावनेतून पाहू नये. या कारवाईमध्ये कुणाला त्रास देण्याचं काही कारण नाही. ते निर्दोष असतील, तर काळजी करण्याचं कारण नाही. राज्यात स्वातंत्र्यानंतर असं पहिल्यांदाच घडत असेल, की कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे माजी गृहमंत्री फरार आहेत. ज्यांच्याकडे या देशाच्या आर्थिक राजधानीची जबाबदारी होती, ते माजी पोलीस आयुक्तही फरार आहेत. हे देशातच नाही तर कदाचित जगात पहिल्यांदा घडत असेल,’ अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत केली आहे.

पहा व्हिडीओ –

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/1226832911168602/

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!