Share

पंतप्रधान मोदी यांचे राजकीय गुरू,गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं आज (ता. २९) निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचे वय ९२ वर्ष होतं. सकाळपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शुक्रवारी त्यांना श्वास घेण्यासाठी अचानक त्रास होऊ लागला. त्यामुळं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. केशुभाई पटेल यांच्या जाण्यानं भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा धक्का बसला आहे.

केशुभाई पटेल दोन वेळा गुजरात राज्याचे मुख्यामंत्री झाले होते, पण दोन्हीवेळेला त्यांना आपला पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करता आला नाही. 2001 साली त्यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मोदी केशुभाई पटेल यांना आपले राजकीय गुरू मानतात.

गुजरातच्या राजकीय पटलावरील केशुभाई पटेल हे एक महत्त्वाचे नेते होते. गुजरातच्या ज्येष्ठ भाजप नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. मात्र 2012 साली त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला. पक्षात्यागानंतर त्यांनी गुजरात परिवर्तन पार्टी हा स्वतःचा नवा पक्ष सुरू केला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!