नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी सलामीवीर फलंदाज वसिम जाफरने अष्टपैलू हनुमा विहारीबद्दल एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, ४ मार्चला श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात हनुमा विहारीला ३ नंबरला संघात स्थान मिळायला हवी. त्यांच्यामते विहारीला संघात संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे.
“ईएसपीएन क्रिकइन्फोबरोबर बोलताना जाफर म्हणाले की, माझ्यामते रोहित शर्मा आणि मयंक अगरवाल डावाची सुरुवात करतील. कारण लोकेश राहुल या मालिकेसाठी उपलब्द नाही. शुभमन गिल आणि विहारी हे तीन नंबरसाठी दावेदार आहेत. परंतु विहारीने सिडनीत ज्याप्रकारे खेळी केली. त्यामुळे त्याला अंतिम आकरामध्ये संधी द्यायला हवी.”
अजिंक्य राहणे आणि चेतेश्वर पुजाराला श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेत संघात सामील केले नाही. त्यामुळे संघात दोन जागा शिल्लक आहेत. जाफरच्या मते पुजाराच्या जागी तीन नंबरला विहारीला संधी देण्यात यावी.
भारत श्रीलंका पहिला कसोटी सामना ४ मार्चला मोहाली येथे खेळला जाणार आहे. त्यातच माजी कर्णधार विराट कोहलीचा हा १०० वा सामना असणार आहे. त्यामुळे स्टेडीयममध्ये ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :

