औरंंगाबाद : जिन्सी परिसरातील कय्यूम कॉलनी येथे राहणा-या ३४ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.३) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
सय्यद फरजाना सय्यद अय्युब (वय ३४) असे विष प्राशन करून आत्महत्या करणा-या महिलेचे नाव आहे. सय्यद फरजाना यांना बेशुध्दावस्थेत उपचारासाठी घाटीत दाखल केले. माजी नगरसेवक जफर बिल्डर यांच्या त्या पत्नी होत्या, काही दिवसांआधी त्यांनी जफर बिल्डर विरुद्ध तक्रार देखील केली होती. त्यांच्यात वाद असल्याचे स्थानिकांनी सांगितले. परंतु, या विषयी अधिकृत माहिती मिळाली नाही.
आत्महत्येच मुळ कारण अद्याप पर्यंत समजले नाही . या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे. घाटीत डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सत्ताकारणात ‘ज्यांच्या हाती ससा तो पारधी’ तरी ‘पारध्याला वाटेल त्याची पारध’ असा अर्थ होत नाही’
- चौथ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने ; बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी
- पोलार्डचा धमाका एकाच षटकात लगावले ६ उत्तुंग षटकार; धनंजय ची हॅटट्रीक
- अग्गबाई, वर एक आणि वधू दोन! बुमराहची खरी वधूराणी कोण? दोघींचे नाव चर्चेत
- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली लस; सर्व ज्येष्ठांनी लस घेण्याचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

