मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून गेल्याची शंका राष्ट्रीय तपास यंत्रणा तसेच राज्य सरकारने व्यक्त केली आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात अँटिलिया स्फोटक तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अनेकदा समन्स बजावूनही परमबीर यांचा कुठेही पत्ता नाही. यामुळे परमबीर सिंग अटकेपासून वाचण्यासाठी देश सोडून फरार झाले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे.
सचिन वाझेच्या अटकेनंतर एप्रिल महिन्यात एनआयएने सर्वात प्रथम परमबीर यांचा वाझेवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईसंबंधी माहिती घेण्यासाठी जबाब नोंदवला होता. प्रकरण समोर आले तेव्हा वाझे थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होते. एनआयएच्या सूत्रांनुसार, ऑगस्टमध्ये परमबीर सिंग यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले होते. परंतु, त्यांनी उत्तर दिले नाही. अधिकारी हरियाणात चंदीगड आणि रोहतकमधील त्यांच्या निवासस्थानीदेखील गेले होते, पण ते सापडले नाहीत.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गृहविभाग मे महिन्यापासून परमबीर सिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. ५ मे रोजी परमबीर सिंग सुट्टीवर गेले होते. परमबीर सिंग यांच्याविरोधात मुंबई आणि ठाण्यात एकूण पाच एफआयआर दाखल असून यापैकी तीन प्रकरणांचा तपास सीआयडी करत आहे. सीआयडी आणि ठाणे पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दक्षता व गुणनियंत्रण मंडळ कार्यालय होणे ही मराठवाड्यासाठी अभिमानास्पद बाब’
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- तो आवाज माझा नाहीच हे विरोधकांचे कारस्थान; सुनिल कांबळेंचे स्पष्टीकरण
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- वरती सत्तेत एकत्र, पण खाली कार्यकर्त्यांची डोके फोड सुरूच- विजय शिवतारे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

