Share

‘परप्रांतीयांना सरसकट आरक्षण देताच येणार नाही’ ; फडणवीसांनी सांगितला कायदा

Published On: 

मुंबई : उत्तर भारतात ओबीसी प्रवर्गातील जातींना आरक्षण मिळत आहे, त्याचा लाभ त्यांना महाराष्ट्रात मिळत नाही. उत्तर भारतातील ओबीसी समाजाचे अनेक लाख नागरिक अनेक पिढ्यांपासून महाराष्ट्रात राहात आहेत. त्या लोकांना महाराष्ट्राच्या ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकार केंद्रीय मागासवर्ग आयोगाला प्रस्ताव पाठवणार आहे. गुरुवारी मंत्रालयात काँग्रेसचे माजी मंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी शिष्टमंडळासह मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. यानंतर नसीम खान यांनी ही माहिती दिली.

परंतु आता महाराष्ट्रात परप्रांतीयांना आरक्षण मिळणार कि काय ? म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. यावर आता विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ‘खरतर सरसकट अशा प्रकारचे आरक्षण देता येत नाही. प्रत्येक ठिकाणी एक स्टेट लिस्ट असते. यामध्ये अनेक परप्रांतीय जाती आपल्याकडे आहेत. जसे कि गुजरातचे लेवा पटेल आहेत त्यांना आपल्याकडे आरक्षण आहे.

उत्तरप्रदेश आणि बिहारमधील यादव आहेत ज्यांना महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे. ज्याच्यामुळे जी स्टेट लिस्ट आहे त्यामध्ये ज्यांना समाविष्ट करण्यात आले आहे ते कुठल्याही प्रांतातील असले तरी त्यांना आरक्षण हे मिळते. आणि ज्यांना समाविष्ट केलेले नाही त्यांना मिळू शकत नाही.’ असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.

तर आता याच पार्श्वभूमीवर मनसे चांगलीच आक्रमक झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी यावर ट्विट करुन जोरदार टीका केली आहे. ‘भैय्याला दिली ओसरी भैय्या हातपाय पसरी, आजपर्यंत मुंबईने सगळ्यांना सामावून घेतले आहे म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की इथल्या भूमीपुत्रांच्या अधिकारांवर आणि हक्कांवर गदा आणाल. हिम्मतच कशी होते महाराष्ट्र मध्ये उत्तर भारतीयांची आरक्षण मागण्याची याद राखा, गाठ मनसेशी आहे.’ असा इशारा त्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!